अहमदनगर जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशीही दमदार पाउस
Ahmednagar News: तिसर्या दिवशी नगर जिल्ह्यात मुसळधार पावसाने (Rain) हजेरी लावली.
अहमदनगर : सलग तिसर्या दिवशी नगर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी नगर शहरात ढगफुटीसदृश पाऊस झाला असून सलग तीन तासांपेक्षा मुसळधार पावसानंतर जवळपास रात्रभर भीज पाऊस सुरू होता. नगर तालुक्यातील 11 महसूल मंडळांत रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला असून तालुक्याची एका दिवसाची पावसाची सरासरी 114 टक्के आहे. यासह जिल्ह्यात 55 महसूल मंडळांत दरमदार पाऊस झाला असून 17 मंडळांत अतिवृृष्टीची नोंद झाली आहे. यामुळे तीन दिवसांपूर्वी जिल्ह्याची पावसाची सरासरी 52 टक्क्यांवरून थेट 75 टक्क्यांपर्यंत पोहचली आहे.
जिल्हा प्रशासनाच्या आकडेवारीनुसार नगर जिल्ह्यात नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, केडगाव, नागापूर, जेऊर, चिचोंडी पाटील, वाळकी, चास, रूईछत्तीसी (नगर), शेवगाव तालुक्यातील शेवगाव, पारनेर तालुक्यातील सुपा, भाळवणी, पळशी, श्रीगोंंदा तालुक्यातील काष्टी, जामखेड तालुक्यातील जामखेड या 17 महसूल मंडळांत 65 मि. मी. ते 166 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. यासह नालेगाव, सावेडी, कापूरवाडी, केडगाव, भिंगार, केडगाव, नागापूर, जेऊर, चिचोंडी पाटील, वाळकी, चास, रूईछत्तीसी (नगर). पारनेर, भाळवणी, सुपा, वाडेगव्हाण, वडझीरे, निघोज, टाकळी, पळशी (पारनेर). श्रीगोंदा, काष्टी, बेलवंडी, पेडगाव, देवदैठण, कोळगाव (श्रीगोंदा). जामखेड, खर्डा, नान्नज, नायगाव, अरणगाव (जामखेड). शेवगाव, भातकुडगाव, बोधेगाव, ढोरजळगाव, एरंडगाव (शेवगाव). पाथर्डी, माणिकदौंडी, टाकळी, कोरडगाव, करंजी, मिरी (पाथर्डी). टाकळीमियाँ, वांबोरी (राहुरी). संगमनेर, धांदरफळ, घारगाव, डोळसणे, साकूर (संगमनेर). अकोले, वीरगाव, समशेरपूर (अकोले) याठिकाणी दमदार पावसाची नोंद झाली आहे.
दररोजच्या बातम्या मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा. संगमनेर अकोले न्यूज
नगर 90, पारनेर 91.5, श्रीगोंदा 83.9, कर्जत 67.3, जामखेड 75.5, शेवगाव 86, पाथर्डी 87.3, नेवासा 78, राहुरी 50, संगमनेर 65.7, अकोला 89.9, कोपरगाव 64.4, श्रीरामपूर 41.5 राहाता 58.5 आणि एकूण 75.3 मि.मी., अशी आहे.
Web Title: Heavy rain in Ahmednagar district for the third day in a row
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App