Breaking News | Bhandardara Rain: गत दोन दिवसांपासून मान्सूनने काहीसा जोर धरल्याने भंडारदरा धरणात नव्याने पाणी येणे सुरूच.
भंडारदरा: भंडारदरा धरण पाणलोटात गत दोन दिवसांपासून मान्सूनने काहीसा जोर धरल्याने भंडारदरा धरणात नव्याने पाणी येणे सुरूच आहे. तसेच 112 दलघफू क्षमतेचा वाकी तलावातील साठा काही तासांतच निम्मा होणार असून काल सायंकाळी या तलावातील पाणीसाठा 55.33 दलघफू (49.11टक्के) झाला होता. काल सायंकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने 69 दलघफू पाणी दाखल झाले. या धरणातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात आल्याने 47 दलघफू पाण्याचा वापर झाला तर 22 दलघफू पाणी धरणात जमा झाले.
11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणात काल सायंकाळी 1741 दलघफू (15.77टक्के) पाणीसाठा होता. धरणातून 1080 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे.काल सोमवारी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला होता. तो रात्री उशीरापर्यंत सुरू होता.
नगर जिल्ह्यातील शेती, पिण्याचे पाणी, उद्योग आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्वाच्या मुळा धरण पाणलोटात काल रविवारच्या तुलनेत पावसाचा जोर कमी झाला आहे. या धरणातून पिण्यासाठी आवर्तन सुरू असलेतरी साठा 357 दलघफू पाणीसाठा होता. हे धरण 600 दलघफू क्षमतेचे आहे.
Web Title: Heavy rain in Bhandardara
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study