Home संगमनेर संगमनेर तालुक्याला जोरदार पावसाने झोडपले

संगमनेर तालुक्याला जोरदार पावसाने झोडपले

Breaking News | Sangamner Rain: वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची हजेरी.

Heavy rain lashed Sangamner taluka

संगमनेर : शहरासह तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. मंगळवारी (दि.११) दुपारी पावणे चार वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. एक तासाच्या अधिक वेळ जोरदार पाऊस सुरु होता. वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटाने भीतीचे वातावरणात जोरदार पाउस झाला आहे. शेतात पाणी वाहत होते. संगमनेर शहरात नदी नाल्याचे रूप धारण केले होते. काही भागातील घरांमध्ये पाणी शिरले. .  नाशिक-पुणे महामार्ग, कोल्हार-घोटी राज्यमार्ग आणि शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. चंदनापुरी घाटात सुरुवातीला पुणे-नाशिक लेनवर वाहतूक कोंडी झाली होती. पावसाचा जोर संध्याकाळपर्यंत कायम होता. पाऊस सुरू झाल्यानंतर दुपारीच वाहनांचे दिवे सुरू करून वाहनचालकांना प्रवास करावा लागला. वीजपुरवठा खंडित झाला होता.

संगमनेर शहर, पठार भागातील साकूर, बोटा, घारगाव परिसरातील गावे तसेच संगमनेर खुर्द, खांडगाव, कासारा दुमाला, गुंजाळवाडी, वेल्हाळे, राजापूर, जवळे कडलग, धांदरफळ बुद्रुक, धांदरफळ खुर्द, कौठे धांदरफळ, कोल्हेवाडी, घुलेवाडी, सुकेवाडी, समनापूर, जोर्वे, निंबाळे, तळेगाव दिघे, सोनुशी, नान्नज, काकडवाडी, चिंचोली गुरव, पारेगाव बुद्रुक, डोळासणे, चंदनापुरी, झोळे, सावरगाव तळ, हिवरगाव पावसा, वाघापूर खराडी तसेच इतरही गावांमध्ये कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला.

संगमनेर नगर परिषदेच्या हद्दीतील संगमनेर बसस्थानक परिसर, नवीन नगर रस्ता, भारतनगर, कोल्हेवाडी रस्ता, अलकानगर आदी परिसरात पावसाचे पाणी साचले होते. तसेच अनेक दुकाने, घरांमध्ये, पावसाचे पाणी शिरले. नाल्या तुंबल्या, घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नगर परिषदेच्या व्यवस्थेचे धिंडवडे उडाले. संगमनेर पंचायत समिती समोरील रस्त्यावरही पाणी साचले होते.

संगमनेर खुर्द, गुंजाळवाडी, राजापूर, कासारा दुमाला, खांडगाव, डोळासणे, झोळे, आनंदवाडी, चंदनापुरी, आदी गावांमध्ये शेतात पावसाचे पाणी साचले होते. काही ठिकाणी ओढे, नाले वाहिले. पावसाला सुरुवात झाल्याने संगमनेर तालुक्यातील  शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे, आनंदाचे वातावरण आहे.

Web Title: Heavy rain lashed Sangamner taluka

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here