Home Maharashtra News मान्सून मुंबईत: राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाउस, वीज पडल्याची घटना

मान्सून मुंबईत: राज्यात विविध ठिकाणी जोरदार पाउस, वीज पडल्याची घटना

Heavy rains at various places in the Maharashtra 

मुंबई: सर्वच मान्सूनच्या प्रतीक्षेत होते अखेर मान्सून मुंबईत दाखल झाला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. मुंबई आणि उप नगरात दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. रात्री झालेल्या पावसामुळे झाड उन्मळून पडली, विजेचे खांब देखील पडले. अनेक ठिकाणी वीज पडल्याच्या घटना देखील घडल्या आहेत.

राज्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये मुंबई आणि उपनगरासह, पुणे, नाशिक, कोल्हापूर, जळगाव, वाशिम, अहमदनगर, परभणी, चंद्रपूर, वाशिम अकोला, यवतमाळ या जिल्ह्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. या पावसामुळं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस

अहमदनगर शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी. जेऊरला वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले. या पावसामुळं सखल भागात पाणी साचले. पवसामुळं नगर- औरंगाबाद महामार्गावरील वाहतूकीचा वेग मंदावला होता. संगमनेर, राहुरी भागात जोरदार पावसाने झोडपले. नगर येथे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

Web Title: Heavy rains at various places in the Maharashtra 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here