जोरदार पावसाने जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली, पहा आजची आकडेवारी?
Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात सध्या 19 हजार 260 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू. (Heavy rain)
छत्रपती संभाजीनगर : राज्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर जोरदार पाउसाची श्रुंकला सुरु आहे. गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे, काही ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आला आहे. धरणांमध्ये देखील पाण्याची वाढ होत आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात देखील पाण्याची आवक वाढली आहे. जायकवाडी धरणात सध्या 19 हजार 260 क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे. तर जायकवाडीत 36.35 टक्के पाणीसाठा आहे.
नाशिकसह जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची संततधार पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी आणि शनिवारी येलो अलर्ट देण्यात आला होता आणि त्यानुसार जोरदार पावसाने हजेरी लावली. विशेष म्हणजे गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस झाला आहे. यामुळे गंगापूर धरणात पाणीसाठा वाढला असून, धरणातून 3 हजार 408 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी गोदावरी पात्रातून जायकवाडी धरणात जात आहे. त्यातच जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील दोन दिवसांपासून पाऊस पडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात देखील वाढ होताना दिसत आहे. जायकवाडी धरणात सध्या 19 हजार 260 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
जायकवाडी धरणाची पाणी पातळी फुटामध्ये 1507.78 फूट असून, मीटरमध्ये 459.571 मीटर पाणीसाठा आहे. एकूण पाणीसाठा 1527.291 दलघमी असून, जिवंत पाणीसाठा 789.185 दलघमी पाणीसाठा आहे. धरणाची पाणीसाठ्याची टक्केवारी पाहिल्यास 36.35 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. तसेच 1 जूनपासून जायकवाडी धरणात 424.69 दलघमी म्हणजेच 15.00 टीएमसी नवीन पाण्याची आवक झाली आहे.
Web Title: Heavy rain increases water inflow in Jayakwadi dam, see today’s data
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App