15 दिवस लॉजमध्ये डांबलं, लैंगिक अत्याचार करत वेश्याव्यवसाय करायला भाग पाडलं
Breaking News | Pune Crime: 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला 15 दिवस लॉजवर डांबून ठेवलं आणि त्यानंतर तिच्याकडून वेश्याव्यवसाय करु घेतल्याचा धक्कादायक प्रकार. ( forced into prostitution)
पुणे : वडिलांच्या आजारपणासाठी घेतलेले 30 हजार रुपये परत देऊ न शकल्यामुळे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला 15 दिवस लॉजवर डांबून ठेवलं आणि त्यानंतर तिच्याकडून वेश्याव्यवसाय करु घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य महिला आयोगाने या घटनेची दखल घेतली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून याबाबत जलद कारवाई करण्याचे तसेच पीडितेचे समुपदेशन करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
महिला आयोगान ट्वीटमध्ये लिहिलंय की, वडिलांनी घेतलेले उसने पैसे परत न दिल्याने त्यांच्या अल्पवयीन मुलीला डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याचे,तिला देहविक्री करण्यास भाग पाडल्याचे प्रकरण माध्यमाद्वारे समोर आले आहे. राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून पुणे पोलिसांकडून याबाबत अहवाल मागवला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला आरोपी पती पत्नी विरोधात पॉक्सो, पिटा सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून आरोपी महिलेस अटक करण्यात आली आहे. फरार आरोपीचा शोध सुरू असून याबाबत जलद कारवाई करण्याचे तसेच पीडितेचे समुपदेशन करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी या घटनेची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, 14 फेब्रुवारीला रात्री उशीरा अल्पवयीन मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली. तिच्यासोबत वाईट प्रकार घडत असल्याचंही समजलं. त्यानंतर लगेच पोलीस पथक कामाला लागलं. के.के मार्केटजवळील लॉजवर दाखल झाले. लॉजवरुन या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ही मुलगी ज्या महिलेबरोबर होती त्या महिलेलादेखील ताब्यात घेतलं. मुलगी विश्रांतवाडीला राहत होती. आरोपी पती-पत्नी आणि ही मुलगी शेजारी होते. मुलीचे वडिल व्यसन करतात. त्यात वडिलांच्या आजारासाठी उसने पैसे घेतले होते. हे पैसे परत करण्यासाठी आरोपी असलेल्या पती-पत्नीने तगादा लावला होता. मात्र वडिलांनी घेतलेले पैसे मुलगी परत करु शकत नव्हती. जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यत तुल सोडणार नाही, असं दाम्पत्याने मुलीला धमकावलं आणि लॉजवर डांबून ठेवलं.याचदरम्यान आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केला. हा आरोपी ड्रायव्हरचं काम करत असल्याने तो पुण्याच्या बाहेर आहे. या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या लॉजच्या मॅनेजरला देखील पोलिसांनी ताब्यात (Arrested) घेतलं आहे. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे.
Web Title: Held in a lodge for 15 days, sexually assaulted and forced into prostitution
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study