Home अहमदनगर राहता तालुक्यात  हॉटेलात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट

राहता तालुक्यात  हॉटेलात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट

Breaking News | Ahmednagar Sex Racket: नगर- मनमाड रोडलगत हॉटेल साई श्रद्धामधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश.

high profile sex racket in a hotel in Rahta taluka

राहता:  राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे डिवायएसपी शिरीष वमने यांनी नगर- मनमाड रोडलगत हॉटेल साई श्रद्धामधील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे.  परप्रांतीय पिडीत तरुणीची पोलिसांनी सुटका केली. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

दि. १४ रोजी वमने यांना वेशा व्यवसायाची खात्रीशिर माहिती मिळाली. हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवुन पंचांसमक्ष त्यांनी छापा टाकला. पोलिस अंमलदार संगीता नागरे यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार लोणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अभ्यासक्रम, इंग्रजी ग्रामर आणि बरेच काही – एजुकेशन पोर्टल 

ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला व अपर पोलिस अधीक्षक वैभव कलूबर्मे, यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी वमने, लोणीचे पोनि कैलास वाघ, पो- हेकाँ इरफान शेख, अशोक शिंदे, असीर सय्यद, पोना श्याम जाधव, संगीता नागरे, निलेश सातपुते, चालक ज्ञानेश्वर गांगुर्डे, शिवाजी नर्हे यांनी यशस्वी केली.

Web Title: high profile sex racket in a hotel in Rahata taluka

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here