Home Maharashtra News मोठी बातमी : विद्यार्थी आंदोलन प्रकरणी Hindustani Bhau Arrested

मोठी बातमी : विद्यार्थी आंदोलन प्रकरणी Hindustani Bhau Arrested

Hindustani Bhau Arrested

Hindustani Bhau Arrested : सोमवारी मुंबई, पुणे आणि नागपुरातील हजारो विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीची परीक्षा रद्द करण्यासाठी हिंसक निदर्शनं केल्याचे पहायला मिळाले. सोशल मीडियावर प्रसिद्ध असणारा हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास पाठक याने विद्यार्थांना दिलेल्या चिथावणीमुळे ते रस्त्यावर उतरले असल्याचे स्पष्ट झाले. मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज देखील केला. दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांची माथी भडकवण्याच्या आरोपाखाली या हिंदुस्थानी भाऊला आता अटक केली आहे.

बहुतांश अल्पवयीन विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. यानंतर पोलिसांनी हिंदुस्थानी भाऊ आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हिंदुस्थानी भाऊने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही व्हिडीओ अपलोड केले होते. यामध्ये त्याने विद्यार्थ्यांना आंदोलनास प्रवृत्त केलं. दहावीची परीक्षा ऑनलाइन घ्यावी, अशी मागणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना करण्यासाठी ‘हिंदूस्थानी भाऊ’ धारावीत आला आणि त्याच्या समर्थनासाठी मोठय़ा संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरले. अचानक झालेल्या या हुल्लडबाजीमुळे परिस्थिती चिघळू लागली. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार करून विद्यार्थ्यांना पांगवले.

शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यासू आहे. दोन दिवसांपासून या प्रकरणात सुरू असलेल्या सर्व गोष्टींचा तपास केला जाईल. हे कृत्य कोणत्या संघटनेकडून ठरवून करण्यात आले आहे का? याची शहानिशा करून पूर्णपणे छडा लावून योग्य ती कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले.

Web Title : Hindustani bhau arrested by police in student agitation case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here