अहमदनगर: हिट अॅण्ड रन , कारच्या धडकेत दोघे ठार
Breaking News | Ahmednagar: हिट अॅण्ड रन, कारच्या धडकेत दोघे ठार
श्रीगोंदा: रात्रीच्यावेळी रस्त्याच्याकडेने फिरणाऱ्या व्यक्तीला कारने धडक दिली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच ठिकाणी संबंधीत कारने दुचाकीला देखील धडक दिली असून चालक देखील जबर जखमी झाला होता. नगरला उपचार सुरू असतांना संबंधीत दुचाकी चालकाचा ही मृत्यू झाला आहे.
जामखेड रस्त्यावर शहरातील औटेवाडी येथे रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. यात गणपत औटी यांचा या मृत्यू झाला. शुक्रवार (दि.१६) रोजी रात्री औटी हे जेवण करून रस्त्याच्या बाजूने फिरत होते. त्यावेळी श्रीगोंदा दिशेने भरधाव वेगात आलेल्या स्विफ्ट कारने त्यांना जोराची धडक दिली. धडक एवढी जोरात होती की औटी उडून पडले. यावेळी औटी यांना रुग्णालयात नेण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका न आल्याने अखेर त्यांना दुचाकीवरून रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. याच कारने यावेळी दुचाकीस्वाराला उडवले. त्यात तो गंभीर झाला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत तेथे न थांबता पळून गेला. दरम्यान, नागरिकांनी जखमी दुचाकीस्वाराला श्रीगोंद्यात सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. मात्र, गंभीर जखमी असल्याने त्याला रात्री नगरच्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. यावेळी प्रविण शेलार जखमी अनोळखी दुचाकीस्वारास
रुग्णालयात दाखल करण्यास मोलाची मदत केली. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला आहे. विशाल गुळवे (रा. नांदुरा, ता. अहमदपूर जि. लातूर) मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
रस्त्याचे काम करण्यात आल्यामुळे हायवे प्रमाणे वाहन चालक गाड्या चालवत आहे. यामुळे याठिकाणी अपघात वाढले आहे. याबाबत औटेवाडी ग्रामस्थ सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासकडे तक्रार करणार आहेत. याठिकाणी प्राथमिक शाळा असून हिरडे वस्ती, मेहेत्रे मळ्यातील विद्यार्थ्यांना हा रस्ता क्रॉस करावा लागतो. यामुळे त्यांच्या जिवीताचा प्रश्न असल्याने या रस्त्यावर आवश्यक असणाऱ्या ठिकाणी गतीरोधक बसवण्याची मागणी करण्यात येत आहे.
Web Title: Hit and run, two killed in a car collision
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study