Akole: अकोले तालुक्यात कृषी विधेयकाची होळी, जाहीर निषेध
अकोले | Akole: आज शुक्रवारी अकोलेत केंद्रसरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयकाची होळी केली आहे. तालुक्यातील सर्वपक्षीयांनी एकत्र येत कृषी विधेयकाचा जाहीर निषेध केला आहे. यामध्ये तालुक्यातील माकप, भाकप, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रीय दल, शेतकरी संघटना आदी कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी नवीन कृषी विधेयकाची होळी केली आहे.
मार्क्सवादी किसान सभेचे राज्यसचिव डॉ. अजित नवले आणि राष्ट्रवादी पक्षाचे आ. डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वात होळी करण्यात आली आहे. शुक्रवारी या विधेयकाची वसंत मार्केटसमोर होळी करून कार्यकर्त्यांचा मोर्चा तहसील कचेरीवर नेण्यात आला. यावेळी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या निषेध प्रसंगी कारभारी उगले, अॅड. शांताराम वाळूंज, मच्छिंद्र धुमाळ, विनय सावंत, महेश नवले, चंद्रकांत नेहे यांची भाषणे झाली.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळावा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, and Latest Marathi News
Web Title: Holi of Agriculture Bill in Akole taluka