Home अहमदनगर अहमदनगर: कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर, पोलिसांचा छापा

अहमदनगर: कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर, पोलिसांचा छापा

Breaking News | Ahmednagar: कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर सुरू असलेल्या एजिस कॅफेवर तोफखाना पोलिसांनी छापा (Raid).

Hookah parlor disguised as a cafe, police raid

अहमदनगर: सावेडी उपनगरातील सोनानगर-चौकात कॅफेच्या नावाखाली हुक्का पार्लर सुरू असलेल्या एजिस कॅफेवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला. हुक्का पिण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंमलदार बाळासाहेब भापसे यांनी फिर्याद दिली आहे.

ऋषिकेश उर्फ सोनू सतीश हिंगे (वय २२ रा. भूतकरवाडी, बालिकाश्रम रस्ता), सोनू दाभाडे (रा. भुतकरवाडी, बालिकाश्रम रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. सोनानगर चौकातील एका पत्र्याच्या शेडमध्ये एजिस कॅफेत हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील, पोलीस अंमलदार सुनील शिरसाठ, संदीप धामणे, सतीश त्रिभुवन, भापसे यांच्या पथकाला सदर ठिकाणी कारवाई करण्याची सूचना दिली. पथकाने सदर ठिकाणी बुधवारी (दि. २०) सायंकाळी सातच्या सुमारास पंचासमक्ष छापा टाकला असता तेथे हुक्का पिण्यासाठी वापरत असलेले साहित्य मिळून आले. हुक्का पार्लर चालविणारा सोनू हिंगे याला ताब्यात घेतले.

Web Title: Hookah parlor disguised as a cafe, police raid

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here