संगमनेरातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी हॉटेल चालकास अटक
Sangamner Crime: महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस, या गुन्ह्यातील सह आरोपी असलेला हॉटेल चालकाला मध्यरात्री अटक (Arrested).
संगमनेर: संगमनेर शहर पोलीस स्टेशन हद्दीत कालच महाविद्यालयातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपींना कालच अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यातील सह आरोपी असलेला हॉटेल चालकाला मध्यरात्री अटक केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे.
आरोपींनी पीडीतेवर बलात्कार करण्यासाठी संगमनेर शहर व परिसरातील तसेच शिर्डी येथील कॅफे व हॉटेलचा वापर केला होता. हॉटेल चालक-मालक यांनी कोणत्याही व्यक्तींना हॉटेल देतेवेळी त्यांच्या वयाची खातर जमा करणे आवश्यक असते परंतु या प्रकरणांमध्ये तशी कोणतीही खातर जमा न केल्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कारासारखी घटना हॉटेलमध्ये घडल्याचे निष्पन्न झाल्यामुळे संबंधित हॉटेल चालक-मालक यांना देखील या गुन्ह्यांमध्ये सहआरोपी करण्यात आले आहे. बुधवारी रात्री उशिरा या गुन्ह्यातील हॉटेल साइतेज चे चालक ज्ञानेश्वर किसन क्षीरसागर यांना अटक करण्यात आलेली आहे.
दरम्यान अल्पवयीन मुलगी संगमनेर शहरातील एका महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. एप्रिल २०२३ ते २१ ऑगस्ट दरम्यान आशिष राऊत व किरण सोपान राऊत (दोघे रा.मालुंजकर वस्ती, राऊतमळा, घुलेवाडी) यांनी या अल्पवयीन मुलीच्या अज्ञान पनाचा गैरफायदा घेत तिला फुस लावून संगमनेर, शिर्डी, पेमगिरी, विठ्ठलकडा, कर्हेघाट अशा विविध ठिकाणी नेवून तिच्यावर सातत्याने अत्याचार केला आहे. त्यानंतर सागर मालुंजकर, कॅफे मालक व लॉज मालक या दोघांनी अशिष व किरण यांना मदत केली आहे.
Web Title: Hotel driver arrested in Sangamner case of rape of minor girl
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App