हॉटेल कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या
Breaking News | Pune Crime: हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने दोरीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
पुणे: हॉटेलमध्ये काम करणाऱ्या कामगाराने दोरीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.1) सकाळी आठच्या सुमारास बोरकर मळा येथे उघडकीस आली आहे. शंकर मोहनराव शिंदे (वय-27 रा. लोणी काळभोर, बोरकर मळा, मूळ रा. मुरखेड नागेली, जि. नांदेड) असे आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
याबाबत स्वप्नील राजेंद्र कदम (रा. बोरीऐंदी, ता. दौंड, जि. पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर शिंदे हे मागील दीड वर्षापासून पुणे-सोलापूर महामार्गावरील एका हॉटेलमध्ये काम करत होते. ते आपल्या इतर सहकारी कर्मचाऱ्यांसह त्या हॉटेलच्या रुममध्ये राहत होते. मंगळवारी (दि.30 एप्रिल) शिंदे यांच्या मित्राचा वाढदिवस होता. शिंदे वाढदिवसाला न जाता रुममध्ये थांबले होते. दरम्यान, बुधवारी (दि.1) सकाळी आठच्या सुमारास वाढदिवसाला गेलेले सहकारी परतले. त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सहकाऱ्यांनी दरवाजा तोडून पाहिले असता शंकर शिंदे हे दोरीच्या सहाय्याने छताच्या पंख्याला गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. शंकर शिंदे यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
Web Title: Hotel employee committed suicide by hanging himself
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study