Home बीड मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाणाऱ्या तरुणीवर हॉटेल मालकाचा अत्याचार

मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाणाऱ्या तरुणीवर हॉटेल मालकाचा अत्याचार

Breaking News | Beed Crime: मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी जात असलेली २० वर्षीय तरुणीवर ती पाणी पिण्यासाठी एका हॉटेलवर गेली असता तिचा मोबाईल चार्जिंग लावण्याच्या बहाण्याने एका हॉटेल चालकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना.

Hotel owner abuses young girl going to friend's birthday

बीड | Beed Crime: इन्स्टाग्रामवर मैत्री झालेल्या एका मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी जात असलेली २० वर्षीय तरुणीवर ती पाणी पिण्यासाठी एका हॉटेलवर गेली असता तिचा मोबाईल चार्जिंग लावण्याच्या बहाण्याने एका हॉटेल चालकाने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची खळबळजनक घटना केज तालुक्यात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  दि. ११ जून रोजी सोलापूर जिल्ह्यातील वैराग येथील एक वीस वर्षीय घटस्फोटित तरुणी ही केज येथील तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला केजकडे जात होती. दरम्यान, ती पाणी पिण्यासाठी माळेगाव चौकाच्या जवळ असलेल्या हॉटेल संकेतमध्ये गेली. तेथे पाण्याची बॉटल न मिळाल्याने ती माळेगाव चौकात गेली. तेवढ्यात संकेत हॉटेलमधील विकास गोरे हा तिच्या पाठीमागे आला. त्याने तरुणीला काही अडचण आल्यास माझ्या मोबाईलवर फोन करण्यास सांगितले. त्यावर त्या तरुणीने आपल्या मोबाईलचे चार्जिंग संपल्याचे सांगितले. यानंतर विकास गोरेने माझ्‌या हॉटेलवर जाऊ तिथे तुझा मोबाईल चार्जिंग करून देतो, असे म्हटले. तरुणीने विकासवर विश्वास ठेवला आणि ती तिच्या हॉटेलवर गेली तिथे आपला मोबाईल चार्जिंगला लावला. त्यावेळी ती हॉटेलच्या मागील भागात बसली. थोड्‌यावेळाने विकास हा तरुणीच्या जवळ गेला आणि त्याने तिच्या हाताला धरून ओढले. तिच्या इच्छे विरुद्ध तिच्यावर बळजबरी करून तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर ती पीडित तरुणी कळंब येथे गेली व रात्रभर ती कळंब येथील बस स्टँडवर थांबली.

त्या नंतर पुन्हा दि. बुधवारी १२ जून रोजी दुपारी १२:३० वा. विकास गोरे कळंब येथील बस स्टँडवर गेला आणि त्या तरुणीला भेटला. त्याने तिला बस स्टँडचे बाहेर बोलावून घेतले. तिला मोटार सायकल बसवून तिला येरमाळा येथील उड्‌डाण पुला जवळ सोडून निघून गेला. गुरुवारी १३ जून रोजी पीडित तरुणी येरमाळा येथून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आली. तिने तिच्यावर घडलेल्या प्रसंगाची माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली. तिच्या फिर्यादीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात विकास गोरे याच्या विरुद्ध भा दं. वि. ३७६ (१) व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पीडित तरुणी ही बुधवारी १२ जून रोजी येरमाळा पोलीस स्टेशन येथे गेली. तिने घडलेला प्रकार तेथील पोलीस कर्मचाऱ्याला सांगितला. येथे गुन्हा दाखल करून तपास युसुफवडगाव पोलिसांच्याकडे वर्ग करणे अपेक्षित असताना येरमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करून न घेता ही घटना युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असून तेथे चौकशीसाठी जाण्यास सांगितले. नंतर दुसऱ्या दिवशी पीडित तरुणी मिळेल त्या वाहनाने युसुफवडगाव पोलीस स्टेशनला आली. या खळबळजनक घटनेने संताप व्यक्त होत आहे.

Web Title: Hotel owner abuses young girl going to friend’s birthday

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here