अहमदनगर ब्रेकिंग: हॉटेलला आग लागून जळून खाक
Ahmednagar News: अहमदनगर शहरातील हॉटेल पंचरत्नला आग (Fire) लागून मोठे नुकसान झाल्याची घटना.
अहमदनगर : शहरातील माळीवाडा बसस्थानकासमोरील पंचरत्न या हॉटेलला आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत हॉटेल मालकाचे मोठे नुकसान झाले असून वस्तूंचा खाक झाला आहे. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत असून सोमवारी (दि. २५) सकाळी ८ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
सोमवारी सकाळी हॉटेलच्या वरील मजल्यातून धूर निघत असल्याचे निदर्शनास आले. याबाबत नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ हे दोन अग्निशमन बंब व पथकासह घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, तोपर्यंत हॉटेलमधील फर्निचर, भांडे व इतर साहित्य खाक झाले होते. आग लवकर आटोक्यात आल्याने शेजारील दुकानांचे नुकसान झाले नाही अथवा इतर कुठलीही हानी या घटनेत झाली नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती.
Web Title: hotel was gutted by fire
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App