भरवस्तीत घरात देहविक्रीचा व्यवसाय, ग्राहकांना महिला आणि तरुणी पुरविल्या जात असताना छापा
Breaking News | Bhandara Crime: अनैतिक देहव्यापाराचा पर्दाफाश, तसेच छापा टाकून पोलिसांनी तीन महिला आणि पुरुष ग्राहकांना रंगेहाथ अटक.
भंडारा: भंडाऱ्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका घरात सुरू असलेल्या अनैतिक देहव्यापाराचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. तसेच छापा टाकून पोलिसांनी तीन महिला आणि पुरुष ग्राहकांना रंगेहाथ अटक केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून, ते घर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सील करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, भंडारा शहरातील रमाबाई आंबेडकर वार्डातील जुन्या रेल्वे लाईनजवळील एका घरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू होता. या घरात अनैतिक धंदा सुरू होता. देहविक्रीसाठी ग्राहकांना महिला आणि तरुणी पुरविण्यात येत होत्या, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी तत्काळ छापा टाकून घरात चालणाऱ्या या अनैतिक धंद्यावर कारवाई केली. या छाप्यात महिलांसह चार ग्राहक शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने उपस्थित असल्याचे आढळून आले. पोलिसांनी भंडाफोड करत आरोपींना रंगेहाथ पकडलं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
तसेच ज्या ठिकाणी हा अनैतिक व्यवसाय सुरू होता ते घर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सील करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Breaking News: House-based prostitution business, women and young girls being supplied