Home पुणे HSC Board Exam : बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार ऑनलाईन

HSC Board Exam : बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट उद्यापासून मिळणार ऑनलाईन

HSC Board Exam 2023: उद्यापासून मिळणार ऑनलाईन जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट).

HSC Board Exam 2023 Hall ticket online

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ घेतल्या जाणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्याचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उद्या २७ जानेवारी) उपलब्ध होणार आहे.

राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी संबंधित प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची आहे. राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर कॉलेज लॉगीन मध्ये प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल. प्रवेशपत्र डाऊनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी.

प्रवेश पत्र विषय माध्यम बदल असल्यास त्या दुरुस्ती शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी विभागीय मंडळास जाऊन करून घ्यायच्या आहेत.  प्रवेशपत्रावरील छायाचित्र स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्ती, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्याची प्रत विभागीय मंडळात सादर करायची आहे. प्रवेशपत्र विद्यार्थ्याकडूनगहाळ झाल्यास पुन्हा प्रत घेऊन त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा नमूद करावा. छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचे छायाचित्र चिटकवून मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे. प्रवेशपत्रासाठी कोणतेही शुल्क घेऊ नये,  अशा सूचना राज्यमंडल सचिव यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिल्या आहेत.

Web Title: HSC Board Exam 2023 Hall ticket online

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here