Home महाराष्ट्र HSC EXAM 2021: बारावी परीक्षेवर आज ठोस निर्णय का

HSC EXAM 2021: बारावी परीक्षेवर आज ठोस निर्णय का

HSC EXAM 2021 Decision Meeting

HSC EXAM 2021: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली रविवारी राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षणमंत्र्यांची एक उच्चस्तरीय बैठक पार पडणार आहे. या बैठकीत कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या बारावी बोर्डाच्या परीक्षेसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांच्या मुद्यांवर चर्चा होणार आहे. त्यामुळे परीक्षा विषयी ठोस निर्णय बाहेर येण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १४ एप्रिल रोजी १० वी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आली होती. तर १२ वी बोर्डाच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. तेव्हापासून आजपर्यंत या परीक्षांविषयी कोणताही ठोस निर्णय न झाल्यामुळे विद्यार्थी व पालकांत संब्र्हम अवस्था निर्माण झाला आहे.

रविवारी सकाळी ११:३० वाजता डिजिटल पद्धतीने होणाऱ्या या बैठकीत केंद्रीय शिक्षणमंत्री यांच्यासह स्मृती इराणी व प्रकाश जावडेकर उपस्थित रहाणार आहे. शिक्षण मंत्र्यांच्या निवेदनानुसार या बैठकीत १२ वी बोर्डाच्या प्रलंबित परीक्षेसह व्यावसायिक अभ्यासक्रम प्रवेश परीक्षांवर चर्चा होईल.

Web Title: HSC EXAM 2021 Decision Meeting .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here