Akola: घरामधील कुलरचा शॉक (Electric Shock) लागल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना.
अकोला: घरामधील कुलरचा शॉक लागल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना महान येथे ३० जुलै रोजी दुपारी घडली आहे.
महान येथील प्रभाकर जानोरकार (७०) हे रविवारी सायंकाळी शेतातून घरी आले असता त्यांना घराचे दार आतून लावलेले दिसले. त्यांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांची पत्नी निर्मला जानोरकार (६५) या कुलरच्या पाठीमागे खाली पडलेल्या दिसल्या. प्रभाकर यांनी घरामागील दरवाजामधून आत प्रवेश केला. पत्नीला उचलण्यासाठी ते कुलरच्या समोरून जात असताना त्यांच्या हाताचा कुलरला स्पर्श झाल्याने त्यांनासुद्धा विद्युत शॉक लागला. ही घटना गावातील काहींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी घराबाहेरील मीटरजवळ काठीने मारा केला. परंतु, वीज प्रवाह खंडित झाला नाही. तोपर्यंत दोघेही ठार झाले.
Web Title: Husband and wife die of Electric shock due to cooler
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App