संगमनेर: दोन मुलांच्या आत्महत्यानंतर पती-पत्नीने ही संपवले जीवन
Breaking News | Sangamner Suicide: पती-पत्नीने गळफास घेत जीवनयात्रा संपवली.
संगमनेर: शहरातील वाडेकर गल्लीत राहणार्या पती-पत्नीने गळफास घेत मंगळवारी (दि. 3 सप्टेंबर) दुपारी आपली जीवनयात्रा संपवली आहे.
दोन वर्षांपूर्वी मयत पती-पत्नीच्या अवघ्या सोळावर्षीय मुलाने देखील घरातच तर पाच दिवसांपूर्वी 21 वर्षीय मोठ्या मुलाने पुण्यात गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर या दोघांच्या जन्मदात्यांनीही आत्महत्या केली आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरुन, संगमनेर नगरपालिकेत लिपीक पदावर सेवेत असलेले मात्र काही महिन्यांपूर्वी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारणारे गणेश वाडेकर व घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या गौरी वाडेकर यांनी आपल्या राहत्या घरात छताला गळफास बांधून जीवन संपवले. पाच दिवसांपूर्वी पुण्यात शिक्षण घेणारा त्यांचा मोठा मुलगा श्रीराज गणेश वाडेकर यानेही आपल्या खोलीत गळफास घेतला होता.
तर दोन वर्षांपूर्वी त्यांचा छोटा मुलगा श्रेयस यानेही वाडेकर गल्लीतील आपल्या घरातच गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यातच मंगळवारी दुपारी सव्वा चारच्या सुमारास घडलेल्या आईवडीलांनी देखील आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा शहर पोलीस पुढील तपास करत आहे.
Web Title: Husband and wife ended their lives after the suicide of two children
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study