Home अहमदनगर अहमदनगर जिल्हा हादरला, पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

अहमदनगर जिल्हा हादरला, पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं

Breaking News | Ahmednagar: एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलींना जिंवत जाळलं.

Husband burnt his wife and 2 daughters alive

अहमदनगर : देशभरात होळीचा सण उत्साहात साजरा होत असताना अहमदनगर जिल्ह्यात  एक हादरवणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन मुलींना जिंवत जाळलं. या तिघांचाही मृत्यू (Death) झाला.

नगर तालुक्यातील पिंपळगाव लांडगा येथे ही धक्कादायक घटना आहे. लीलाबाई सुनील लांडगे, साक्षी आणि खुशी अशी मृतांची नावं आहेत.  माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. नगर पोलिसांनी आरोपी सुनील गोरख लांडगे याला ताब्यात घेतलं आहे. हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन सुनील लांडगे याने हे कृत्य सकाळी ९.३० ते १० दरम्यान केले. सुनील लांडगे हा शेती व मजुरी करतो. सकाळी त्याने पत्नी व दोन लहान मुलींना घरात कोंडून घेतले. नंतर गावातीलच महामार्गालगत असलेल्या पेट्रोल पंपावरून डबा भरून पेट्रोल आणले. खिडकीतून पेट्रोल टाकले व घर पेटवून दिले.

Web Title: Husband burnt his wife and 2 daughters alive

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here