धक्कादायक! महिला पोलिस पत्नी आणि मुलीची निर्घृण हत्या करून पतीची आत्महत्या
Suicide News: पोलिस महिला कर्मचारी असलेल्या पत्नी आणि मुलीची चाकूने हत्या करून पतीने स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे.
बुलढाणा: चिखली येथे पोलिस महिला कर्मचारी असलेल्या पत्नी आणि मुलीची चाकूने हत्या करून पतीने स्वतः आत्महत्या केल्याची धक्कादायक घटनेने खळबळ उडाली आहे. यामुळे नागपंचमीला बुलढाणा जिल्हा हादरला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे आज सोमवारी खुनी थरार प्रसंग घडला. खामगाव रोडवर असलेल्या पंचमुखी हनुमान मंदिराजवळ एका घरात हा घटनाक्रम घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, किशोर जनार्दन कुटे असे आरोपी पती (पित्याचे) नाव आहे. त्याने महिला पोलिस कर्मचारी असलेल्या पत्नी वर्षा दंदाले चाकूने सपासप वार करून हत्या केली. या पाठोपाठ कांदा कापण्याच्या चाकूने दीड वर्षाच्या मुलीचीही हत्या केली. दोघांची निर्घृण हत्या केल्यानंतर आरोपी किशोर याने घटनास्थळावरून पळ गाठला. यानंतर थेट अंढेरा परिसरात येवून त्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्यामागील कारण अद्याप समोर आले नाही. चिखली पोलीस घटनास्थळी पोहचले आहे.
Web Title: Husband commits suicide by brutally murdering female police wife and daughter
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App