चारित्र्याच्या संशयावरून पत्नीस जीवे मारून पतीची आत्महत्या, नाशिक हादरलं!
Nashik Crime : चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची डोक्यात दगडी वरवंटा मारून हत्या केल्याची घटना, पतीने देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना.
नाशिक: चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची डोक्यात दगडी वरवंटा मारून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पत्नीचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्याने पतीने देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी कि, विशाल निवृत्ती घोरपडे, २९ रा. धनश्री विशाल घोरपडे, २६ दोघे रा. तुळजा भवानी निवास, इच्छामणी नगर, आडगाव शिवार, नाशिक हे दोघे पतीपत्नी आपल्या अडीच वर्षाच्या मुलगा आणि विशालची आई यांच्या सोबत राहत होते. गेल्या काही महिन्यांपासून विशाल याला धनश्री हिचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने या दोघा पतीपत्नीमध्ये भांडण होत होते. मात्र, गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून हि भांडणे जास्तच सुरु झाली होती. मंगळवार (ता. १२) रोजी रात्री अकरा साडेअकरा वाजेच्या सुमारास या दोघांमध्ये जोरदार भांडण सुरु झाल्याने. विशालच्या आईने आपल्या अडीच वर्षाच्या नातवाला घेऊन बाहेर असलेल्या महादेव मंदिरात जाऊन झोपली होती
बुधवार (ता. १३) रोजी सकाळी उठून विशालची आई घरी आली असता तिला मुलाने गळफास घेत आत्महत्या केल्याचे दिसून आले तर सून धनश्री हि रक्ताच्या थारोळ्यात किचनमध्ये पडलेली दिसून आल्याने भयभीत झालेल्या आईने आडगाव पोलिसांना माहिती दिली.
या घटनेची माहिती मिळताच आडगाव ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असता, विशालने अंदाजे रात्री बारा वाजेनंतर आपल्या पत्नीच्या डोक्यात दगडी वरवंटा टाकून हत्या केल्यानंतर स्वतः आत्महत्या केली असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. आडगाव पोलीस अधिक तपास करत आहे.
Web Title: Husband commits suicide by killing wife due to suspicion of character
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App