ब्रेकिंग न्यूज! लॉजमध्ये बायकोचा खून करून पती पसार
Breaking News | Baramati Crime: एका लॉजमध्ये आज एका महिलेचा खून (Murder) झाल्याची धक्कादायक घटना.
बारामती: बारामती शहरातील मध्य बाजारपेठेत सिनेमा रोडवरील एका लॉजमध्ये आज एका महिलेचा खून झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि ४) घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रेखा विनोद भोसले (वय 36, रा. सोनवडी, ता. दौंड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्यासोबत तिचा पती विनोद भोसले हा देखील या लॉजमध्ये पत्नी सोबत उतरला होता. तिचा खून करून पती फरार झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या संदर्भात पोलिसांनी अधिक तपास सुरू केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.
पतीला ताब्यात घेतल्यानंतर खुनाच्या कारणाचा उलगडा होणार आहे. संबंधित महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी दवाखान्यात नेण्यात आला आहे. पतीने पत्नीचा कौटुंबिक वादातून खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
Web Title: Husband escapes after killing his wife in the lodge
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study