Home अहमदनगर अहमदनगर: चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून

अहमदनगर: चारित्र्याच्या संशयातून पतीने केला पत्नीचा खून

Breaking News | Ahmednagar: चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना.

husband killed his wife due to suspicion of her character

अहमदनगर : चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना सोमवारी (दि. १७) सकाळी साडेआठ ते मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान सिद्धार्थनगर (नगर) परिसरात घडली. रेवती उर्फ राणी संदीप सोनवणे (वय ३५) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी संदीप उर्फ कुंदन

राधाजी सोनवणे, रा. सिद्धार्थनगर याच्या विरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत बाळू केशव साठे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मुलीचा विवाह अठरा वर्षांपूर्वी संदीप सोनवणे याच्याशी झाला होता. तो मुलीला मारहाण करत होता. ७ जून रोजी रेवती हिने वडिलांना फोन करून नवऱ्याने मारहाण केल्याचे कळविले. त्यामुळे वडील मुलीला त्यांच्या बुऱ्हाणनगरला येथील घरी नेले. तिथे जावई संदीप आला. त्याने तुमच्या मुलीला मारहाण करणार नाही, असे सांगून तो सोमवारी (दि. १७) सकाळी साडेआठ वाजता मुलीला घेऊन सिद्धार्थनगरला आला होता.

मंगळवारी दुचाकी आणण्यासाठी वडील मुलीच्या घरी सिद्धार्थनगरला गेले. त्यावेळी त्यांना घर बंद दिसले. घरातून साउंडचा आवाज येत होता. म्हणून त्यांनी दरवाजाची कडी उघडून आत प्रवेश केला असता मुलगी रक्त्ताच्या थारोळ्यात दिसली.

Web Title: husband killed his wife due to suspicion of her character

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here