पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली तरुणाची हत्या
Latur Crime News: पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत स्वत:च्या चुलत भावाची हत्या (Murder).
लातूर: पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत स्वत:च्या चुलत भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. लातुरच्या औसा तालुक्यातील शिंदाळवाडी गावातील ही घटना आहे. आरोपीने भावावर चाकूने वार करत त्याची हत्या केली आहे. या घटनेनंतर गावात मोठी खळबळ उडाली आहे. प्रदीप राठोड असं खून झालेल्या तरुणाचे नाव होते. बालाजी सुभाष राठोड असं आरोपीचं नाव आहे. प्रदीप हा २८ वर्षाचा होता. तो बालाजीचा चुलत भाऊ होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर मध्ये औसा तालुक्यातील शिंदाळवाडी राहणारा बालाजी याने चुलत भावाची हत्या केली. आपल्या पत्नीचा प्रदीप सोबत अनैतिक संबंध असल्याचा बालाजीला संशय आला यावरून त्याने प्रदीपची चाकूने भोसकून हत्या केली. बालाजी आपल्या पत्नीसोबत नेहमी याचं कारणावरून भांडण करायचा. तर तीला मारहाण देखील करायचा असं पोलिसांनी सांगितले. त्यामुळे रागाच्या भरात त्याने टोकाचं पाऊल उचलत त्याने प्रदीपला संपवून टाकायचे ठरवले.
१२ नोव्हेंबरला प्रदिपला मारण्याचे ठरवले. त्यादिवशी गावात फिरत असताना दिसला. बालाजी आपल्या एका मित्रासोबत निघाला. बालाजीने त्याला घेरून तुला मी सोडणार नाही असं म्हणत त्याने प्रदीपवर चाकूने हल्ला केला. बालाजीच्या मित्राने देखील प्रदीपच्या छातीत चाकूने भोकसले. यात त्याचा मृत्यू झाला. बालाजी आणि त्याचा मित्र घटनास्थळावरून फरार झाले. ही माहिती गावात पसरताच पोलिसांना समजली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतलं, पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहे.
Web Title: husband Murder the young man on suspicion of his wife’s character
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App