Home Crime News धक्कादायक! पती करत होता पत्नीची हत्या आणि लोक करत होते शूटिंग

धक्कादायक! पती करत होता पत्नीची हत्या आणि लोक करत होते शूटिंग

Kolhapur Crime

Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथे पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ज्यावेळी आरोपी पत्नीची हत्या करत होता त्यावेळी शेजारी नागरिक उपस्थित होते मात्र त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेत सदर प्रकाराची व्हिडीओ रेकॉर्डिंग केली. ही हत्या होत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओने एकच खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, 25 जानेवारी रोजी ही घटना घडली आहे. आरोपी इम्तियाज नदाफ याने आपली पत्नी समिना हिच्यावर धारदार शस्त्राने वार केले. रात्री 9 च्या सुमारास ही घटना घडली आहे. पत्नीवर धारदार शस्त्राने वार करुन आरोपी इम्तियाज याने घटनास्थळावरुन पोबारा केला. मात्र तरीही पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

प्राथमिक माहिती नुसार आरोपी इम्तियाज नदाफ याने दारुच्या नशेत पत्नीवर हल्ला केला. धारदार शस्त्राने हल्ला केल्याने पत्नी समिना गंभीर जखमी झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पत्नीचा अखेर मृत्यू झाला. आरोपी इम्तियाज हा समिनाच्या वडिलांच्या गाड्यावर गेला होता. त्यावेळी समिना देखील तेथे उपस्थित होती. दरम्यान दोघांत झालेल्या वादानंतर इम्तियाजने तिच्यावर हल्ला केला. समिना आपले प्राण वाचवण्यासाठी पळू लागली आणि शेजारील दुकानात शिरली. इम्तियाजने तिच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करुन तिची हत्या केली.

धक्कादायक बाब म्हणजे ज्यावेळी ही घटना घडत होती त्यावेळी तेथे उपस्थित असलेले नागरिक केवळ बघ्याची भूमिका घेत होते. पीडित समिना मदतीसाठी आरडाओरड करत होती पण कुणीही तिच्या मदतीसाठी धावून आलं नाही. उलट तिचा पती धारदार शस्त्राने वार करत असताना नागरिक मोबाइलमध्ये व्हिडीओ बनवीत होते. जर वेळीच तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी समिनाच्या मदतीसाठी धाव घेतली असती तर कदाचित समिनाचे प्राण वाचले असते. या घटनेमुळे माणसातली माणुसकी मेली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web title : Husband kills wife in Kolhapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here