Home क्राईम Murder: पतीनेच केला आपल्या पत्नीचा खून अन

Murder: पतीनेच केला आपल्या पत्नीचा खून अन

husband Murder his wife

पारनेर | Murder: तालुक्यातील जामगाव येथे पतीनेच आपल्या पत्नीचा खुन करून पसार  झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.  सदर कुटुंब रायगड जिल्ह्यातील रहिवासी आहे. मजुरीच्या कामानिमित्त ते पारनेर तालुक्यातील जामगाव येथे आले होते.

शेवंता मच्छू नाईक (वय 45 वर्ष ) रा .नागदारी ता .अलिबाग जिल्हा.रायगड असे या मयत महिलेचे नाव आहे. ती व तिचा नवरा मच्छू नाईक हे महिनाभरापासून जामगांव येथे बाहेरील एका ठेकेदाराकडे काम करत होते.

याबाबत अधिक माहिती अशी की,  रविवारी सकाळी नेहमी प्रमाणे त्यांच्या सोबत काम करणारे मजूर कामावर झाडे तोडायला निघाले असता मृत महिला शेवंता व तिचा पती मच्छू लवकर उठले नाही म्हणून त्यांच्या सोबत काम करणारे कामाला सकाळी ६ वाजता निघून गेले व १२ वाजून १५ मिनिटांनी जेवणं करायला घराकडे आले असता अजून कामावर का आला नाही व कामावरून पळून गेला की काय याची खात्री करायला त्याच्या राहत्या झोपडीत जाऊन पाहिले असता शेवंता मयत अवस्थेत आढळून आली. तिचा नवरा सकाळी पहाटे ५ वाजेपर्यंत होता व तो सकाळी पळून गेला अशी माहिती सोबत काम करणाऱ्या व्यक्तीनी दिली. याबाबत माहिती आसपास राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना दिली. .या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: husband Murder his wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here