पत्नीचे गावात अनैतिक संबंध, अडसर ठरणाऱ्या पतीची दोघांनी केली हत्या
बुलढाणा | Buldhana Crime : अनैतिक संबंधात (immoral relationship) अडसर ठरणाऱ्या पतीस प्रियकराच्या मदतीने पत्नी नेच हात पाय बांधून आणि गळा आवळून ठार (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे मंगळवारी ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी साखरखेर्डा पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिचा आरोपी प्रियकर या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. दोरीने गळा आवळून पतीचा काटा काढला. दत्तात्रय कव्हळे असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. तर एजाज खान असे आरोपी प्रियकराचे नाव आहे.
बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील गोरेगाव येथे पीडित दत्तात्रय कव्हळे आपल्या पत्नीसह राहतात. याच गावात एजाज खानही राहतो. कव्हळे यांची पत्नी आणि एजाज खान यांच्यात अनैतिक संबंध (immoral relationship) होते. याबाबत पतीला कुणकुण लागल्यानंतर गावात गवगवा झाला. यानंतर एजाजने माफी मागितली आणि दोघांचे प्रेमसंबंध तुटले. त्यानंतर कव्हळे दाम्पत्य काही दिवसांसाठी दुसऱ्या गावात कामासाठी गेले होते. मात्र शेती खरेदीसाठी ते पुन्हा गावात आले. यानंतर कव्हळे यांची पत्नी आणि एजाजमध्ये पुन्हा प्रेमसंबंध जुळले.
दत्तात्रय कव्हळे हे मुलीचा दहावीचा पेपर असल्याने तिला परीक्षेसाठी मंगळवारी साखरखेर्डा येथे घेऊन गेले होते. तेथून आल्यावर त्यांचे पत्नीसोबत भांडण झाले. यावेळी तेथे असलेला एजाज आणि कव्हळे यांच्या पत्नीने मिळून त्यांचे हातपाय बांधून त्यांना पलंगावर टाकून दोरीने त्यांची गळा आवळून हत्या (murder) केली. हा प्रकार मयत दत्तात्रयच्या आईच्या लक्षात आल्यावर तिने पोलिसांत तक्रार दाखल केली. फिर्यादीवरून आरोपी पत्नीसह, तिचा प्रियकर एजाज खान पठाणवर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे.
Web Title: Husband murder with the help of boyfriend in an immoral relationship