पतीने दुसऱ्या विवाहाचे फोटो स्टेटसला ठेवले, पहिल्या पत्नीची आत्महत्या
25 वर्षीय डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.
छत्रपती संभाजीनगर : शहरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, 25 वर्षीय डॉक्टर महिलेने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. पती-पत्नीमध्ये झालेल्या वादानंतर प्रकरण न्यायालयात सुरू होते. दरम्यान, चार दिवसांपूर्वी पतीने दुसरे लग्न करून, दुसऱ्या पत्नीसोबतचे लग्नाचे फोटो स्टेटस ठेवल्याने पहिल्या डॉक्टर पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे. डॉ. आयशा शेख (वय 25 वर्षे) असे मृत तरुणीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बुलडाणा येथील डॉ. जैद याच्याशी डॉ. आयशा या तरुणीचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. दोघेही फिजिओथेरपिस्ट असून, लग्नानंतर शहरातील पडेगाव परिसरात राहत होते. त्यांना 2 वर्षांचा मुलगा आहे. सर्व काही सुरळीत सुरु असतानाच पुढे पती-पत्नीमध्ये घरगुती वाद सुरु झाले. वाद आणखीच वाढल्याने आयशा ही पतीचे घर सोडून माहेरी येऊन राहू लागली. वाद आणखीनच टोकाला गेल्याने प्रकरण थेट कोर्टात जाऊन पोहचले. दरम्यान, न्यायालयात वाद सुरु असतानाच डॉ. जैद याने चार दिवसांपूर्वी दुसरे लग्न केले. विशेष म्हणजे, दुसऱ्या पत्नीसोबतच्या लग्नाचे फोटो त्याने स्टेटसवर ठेवले. हे पाहिल्यानंतर आयशा तणावात होती.
पतीने दुसरं लग्न केल्याने आयशा प्रचंड तणावाखाली होती. त्यामुळे मंगळवारी तिने वडिलांच्या राहत्या घरात पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी तिला उपचारासाठी घाटीत दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. त्यामुळे आयशाच्या माहेरच्या लोकांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.
Web Title: Husband posted photos of second marriage on status, first wife’s suicide
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App