Home भारत नवरीच्या डान्सवरून नवरदेवाने भर मांडवात वाजवली कानशिलात; नवरीने केलं दुसऱ्याशी लग्न

नवरीच्या डान्सवरून नवरदेवाने भर मांडवात वाजवली कानशिलात; नवरीने केलं दुसऱ्याशी लग्न

Husband slaps wife

तमिळनाडू : कुड्डालोर येथून एक सिनेमॅटिक प्रकरण समोर आलं आहे. एका नवरदेवाने आपली नवरी चुलत भावासोबत डान्स करत होती म्हणून त्याने तिच्या कानशिलात लगावली. ही बाब इतकी वाढली की नवरीच्या घरच्यांनी नवरदेवाचे हे कृत्य पाहून लगेचच लग्न रद्द करत नवरीसाठी दुसरा नवरदेव शोधून काढीत तिचं लग्न लावून दिलं. यामुळे चिडलेल्या नवरदेवाने थेट पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.

नवरदेव चेन्नईच्या एका खासगी कंपनीमध्ये सिनीअर इंजिनिअर म्हणून काम करतो. 6 नोव्हेंबरला त्याचा साखरपुडा झाला होता. मात्र आता या नवऱ्या मुलाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून मुलीच्या कुटुंबीयांकडे 7 लाखांची नुकसान भरपाई मागितली आहे. लग्नाच्या तयारीसाठी त्याने सात लाख रुपये खर्च केले होते, असे त्याचे म्हणणे असून त्याला ही भरपाई हवी आहे.

प्राप्त माहितीनुसार, 19 जानेवारीला लग्नाच्या एका कार्यक्रमादरम्यान नवरी आणि नवरदेव दोघेही सोबत डान्स करत होते. यादरम्यान नवरीचा चुलत भाऊही तिथे आला आणि त्याने वधू-वरांच्या खांद्यावर हात ठेवून डान्स केला. मात्र वराला ही गोष्ट चांगलीच खटकली. चुलत भाऊ निघून जाईपर्यंत त्याने वाट पाहिली आणि नंतर रागाच्या भरात त्याने नवरीच्या कानशिलात लगावली. ही बाब नवरीला आणि तिच्या कुटुंबीयांना खटकली. नवरदेवाने सर्व नातेवाईकांसमोर नवरीवर हात उचलला व यासाठी त्याने कसलीही पर्वा केली नाही. पोलीस माहितीनुसार, मुलाची तक्रार दाखल करून घेण्यात आली असली तरी त्याच्यावरही नवरीला चापट मारल्याचा आरोप आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र नवरीच्या घरच्यांनी आपल्या नात्यातील एक मुलगा शोधून आपल्या मुलीचं 20 जानेवारीला लग्न लावून दिलं.

आतापासूनच जर नवरा मुलगा आपल्या बायकोला असा त्रास देत असेल तर पुढे काय होईल ? हा विचार करून तिच्या पालकांनी कसलीही तमा न बाळगता सरळपणे लग्न मोडून मुलीला सुखात ठेवण्याच्या दृष्टीने नवा जीवनसाथी शोधून दिला. तर शुल्लक कारणासाठी नव्या नवरीवर हात उचलल्याबद्दल लग्न मोडलेल्या नवऱ्या मुलाला पुन्हा बायको कोण देणार ? असाही एक प्रश्न पडलेला आहे. शेवटी अति राग आणि भिक माग या पंक्ती येथे नक्की आठवतील.

Web Title : Husband slaps wife at wedding ceremony over bride’s dance; The girl married another

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here