पतीसह फिरायला गेली, लॉजवर राहिली, पण नंतर अचानक गायब; महिलेच्या मृत्यूने खळबळ
Nashik News: एका विवाहितेचा गंगापूर धरणात मृतदेह (Death) आढळून आल्याने खळबळ.
नाशिक : शहरात पर्यटनासाठी पतीसमवेत आलेल्या एका विवाहितेचा गंगापूर धरणात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नाशिक तालुका पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या महिलेने पतीसमवेत एमटीडीसी रिसॉर्टमध्ये जेवण केल्यानंतर ती पतीच्या नकळत बाहेर गेली व पाण्यात उडी घेतल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. परंतु, पतीला सदर महिला न दिसल्याने त्याने लॉज गाठून पोलिसांना बेपत्ता असल्याची नोंद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकमध्ये पतीसमवेत पर्यटनासाठी आलेल्या विवाहित महिलेचा मृतदेह शनिवारी (दि. ३०) दुपारी दीड वाजता गंगापूर धरणात आढळल्याने खळबळ उडाली होती. आदिती हरेंद्रसिंग राठोड (वय २८, रा. मध्य प्रदेश, मूळ रा. दिल्ली) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला उपनगर हद्दीतून बेपत्ता झाल्याची नोंद तिच्या पतीने शुक्रवारी रात्री केली होती. शनिवारी दुपारी मृतदेह सापडल्यानंतर नाशिक तालुका पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. आदितीचा भाऊ अखिल राठोड (रा. दिल्ली) याने मृतदेह ओळखला.
नाशिक तालुका पोलिसांनी केलेल्या तपासानुसार आदितीचा घातपात झाल्याचा कोणताही संशय नाही. शवविच्छेदन अहवालानुसार मृतदेहावर कोणत्याही जखमा नाहीत. पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद आहे. त्यामुळे आदितीचा एकतर तोल गेला असावा अथवा तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. नाशिक तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.
शुक्रवारी नेमके काय घडले?
आदिती व तिच्या पतीचे कुटुंबीयांच्या संमतीने काही महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. नाशिकमध्ये आल्यावर त्र्यंबकेश्वर, गड-किल्ले फिरून धार्मिक पर्यटनानंतर दोघेही शुक्रवारी पर्यटन संचालनालयाच्या ग्रेप पार्क रिसॉर्टमध्ये गेले. तिथे जेवण केल्यानंतर पतीच्या नकळत आदिती रेस्टॉरंटबाहेर गेली. पतीने शोध घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर आदिती सापडली नाही. संपर्क साधूनही तो होत नसल्याने पती नाशिकरोड परिसरात तात्पुरत्या वास्तव्यास असलेल्या ठिकाणी आला. तिथेही आदिती नसल्याने त्याने पोलिस ठाण्यात कळविले. पाठोपाठ आदितीच्या नातलगांना कळवून त्यांनाही बोलावून घेतले. पोलिसांच्या माहितीनुसार, आदितीच्या नातलगांनी अद्याप कोणताही आरोप न केल्याने पुढील गुन्हा दाखल नाही.
Web Title: husband, stayed at the lodge, but then suddenly disappeared Shocked by the death of a woman
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App