Home पुणे धक्कादायक! पतीने गळा आवळून करंट देत पत्नीची निर्घुण हत्या

धक्कादायक! पतीने गळा आवळून करंट देत पत्नीची निर्घुण हत्या

Breaking News | Shirur Crime: सततच्या वादातून नवऱ्याचे बायकोची निघृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे.

Husband strangles his wife and electrocutes her

शिरूर: शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथे धक्कादायक घटना घडली आहे. सततच्या वादातून नवऱ्याचे बायकोची निघृण हत्या केली आहे. ही घटना ३ जुलै रोजी दुपारी २ च्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शितल स्वप्निल रणपिसे (वय २३ वर्षे) या महिलेचा पती स्वप्नील श्यामराव रणपिसे याने कौटुंबिक वादातून हत्या केली. पत्नी सतत हिनवत असल्यामुळे हा वाद विकोपाला जात आरोपी स्वप्नील रणपिसे याने पहिले शितलला वायरने करंट दिला त्यानंतर रस्सीने गळा आवळून निघृण हत्या केली आहे.

या घटनेची माहिती मिळताच ए. पी.आय. अमोल पन्हाळकर यांच्यासह स्थानिक पोलिसांनी तपास सुरु केला. या तपासात आरोपी स्वप्नीलकडून अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून शितलची हत्या केल्याचा बनाव करण्यात आला मात्र पोलिसांनी स्वप्नील रणपिसे या आरोपीची कसून चौकशी केली असता आरोपीने गुन्हा कबूल केला.

Web Title: Husband strangles his wife and electrocutes her

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here