Home नाशिक अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा, पत्नी-प्रियकरासह कुटुंबीयांनी रचला कट

अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा, पत्नी-प्रियकरासह कुटुंबीयांनी रचला कट

Breaking News | Nashik Crime:  अनैतिक संबंधातून खुनाची धक्कादायक घटना.

husband's thorn removed from an immoral relationship

नाशिक : घरगुती वाद व अनैतिक संबंधातून खुनाची धक्कादायक घटना नांदगाव तालुक्यात घडली आहे. पत्नी, प्रियकर, बहीण व मुलगा यांनी संगनमताने पतीचा काटा काढला असून 24 तासांच्या आत नांदगाव पोलिसांना तपास करण्यात यश आले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, मुंबई मनपाचे कर्मचारी दीपक गोण्या सोनवणे (54, रा. वाघोरे, ता. अमळनेर, जि. जळगाव) यांची घरगुती वाद व अनैतिक संबंधातून पत्नी, प्रियकर, बहीण व मुलगा यांनी संगनमताने डोक्यात दगड घालून व लाकडी दांडक्याने मारहाण हत्या करण्यात आल्याची घटना नाशिकच्या  नांदगाव येथील जातेगाव येथे घडली.

संशयित पत्नी पल्लवी दीपक सोनवणे, मेहुणी व मेहुणीचा मुलगा, नितीन चंद्रकांत मोरे (रा. म्हसवे, ता. पारोळा) यांनी संदीप (रमेश) महादू लोखंडे (रा. शेजवळ, ता. मालेगाव), साईनाथ बाबुलाल सोनवणे, लखन बाबुलाल सोनवणे (रा. पिंप्री हवेली, ता. नांदगाव) यांच्याशी संगनमत करून खुनाचा कट रचला. त्यानुसार दीपक यांना जातेगाव शिवारातील महादेव मंदिराजवळ बोलावून घेण्यात आले. या ठिकाणी लाकडी दांडक्याने व डोक्यात दगड मारून ठार केले. त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला ढकलून देत प्रेत झाडावर टाकून असा अपघाताचा बनाव करत सर्वांनी पोबारा केला होता.

घटनास्थळी अपघाताचे चित्र दिसत असले तरी त्याबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. आधारकार्डवरून मयताची ओळख पटल्यानंतर कुटुंबीयांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक विश्लेषणानंतर संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. त्यातून खुनाचा उलगडा झाला. सोनवणे व मोरे परिवारातील सहा जणांनी ही हत्या केल्याचे आणि पत्नीदेखील सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. तर 24 तासांच्या आत चार आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: husband’s thorn removed from an immoral relationship

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here