अहमदनगर: फेसबुकवरून ओळख करून विवाहितेवर अत्याचार
Breaking News | Ahmednagar: फेसबुकवर ओळख करून एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना.
कोपरगाव : फेसबुकवर ओळख करून तालुक्यातील एका महिलेवर राहता तालुक्यातील आरोपी आसिफ युनूस पठाण (वय: ३०) याने अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी आसिफ युनूस पठाण याने फेसबुकवर दुसरे नाव वापरून अकाउंट तयार केले. त्यानंतर संबंधित महिलेला मेसेज केला. मेसेजमुळे दोघांमध्ये ओळख झाली. ओळखीतून एकमेकांना भेटण्याचे ठरले. शुक्रवारी सकाळी (दि. ५ जुलै) सकाळी आसिफ पठाण याने फोन करून ‘मी तुझ्या घरी येत आहे’ असे सांगितले. त्यानंतर तो घरी आला, यावेळी संबंधित महिला व तिचा छोटा मुलगा घरी होता. दोघांमध्ये काही वेळ संभाषण झाले, त्यानंतर आसिफने महिलेवर जबरदस्तीने अत्याचार केला. या प्रकाराबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६३, ६९, ३२९, (४) ३१९, (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक वैशाली मुकणे या करीत आहेत.
Web Title: Identification from Facebook Abuse of spouse
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study