Home Ahmednagar Live News धक्कादायक! अवैध दारू विक्रेत्याने फुटलेल्या दारूच्या बाटलीने पोलिसाच्या गळ्यावर वार-Crime News

धक्कादायक! अवैध दारू विक्रेत्याने फुटलेल्या दारूच्या बाटलीने पोलिसाच्या गळ्यावर वार-Crime News

illegal liquor dealer stabbed a policeman in the neck with a bottle of liquor Crime Filed

Ahmednagar | कोपरगाव | Kopargaon Crime: अवैध धंद्यांवर कारवाई करीत असताना पोलिसांबरोबर वाद घालून सरकारी कामात अडथळा आणून पोलिसाला दारूच्या फुटलेल्या बाटलीने गळ्यावर वार करून जीवे मारण्याची घटना कोपरगाव तालुक्यातील जवळके येथे घडली आहे. याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव मधील भिल्ल वस्ती, जवळके येथे अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी गेले असता येथील आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून वाद घालत सरकारी कामात अडथळा आणला. तसेच पोलिसांना शिवीगाळ, दमदाटी करून हाताने, लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडके व दगडांनी मारहाण करून जखमी केले.

यावेळी आरोपींनी पोलीस कॉन्स्टेबल भाऊसाहेब दौलत पवार यांच्या गळ्यावर वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पोलीस नाईक किशोर अस्तीकराव औताडे हेही जखमी झाले आहेत. यावेळी आरोपींनी पोलिसांच्या खाजगी वाहन तसेच मोबाईल फोडून दहशत माजविली.

याबाबत  पोलीस नाईक किशोर अस्तिकराव औताडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी रविंद्र उर्फ गुलाब रतन माळी, वसंत विठ्ठल मोरे, नवनाथ माळी, राजू सोन्याबापु मोरे, अलका राजू मोरे, मंगल रतन माळी, अनिता ज्ञानेश्वर माळी, नितीन राजू मोरे यांच्यासह १० ते १५ अनोळखी नातेवाईक (सर्व रा. भिल्ल वस्ती, जवळके, ता.कोपरगाव) यांच्याविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आठ आरोपींना पोलसानी अटक केली आहे. 

Web Title: illegal liquor dealer stabbed a policeman in the neck with a bottle of liquor Crime Filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here