Home Breaking News अकोले तालुक्यात अवैध दारूसह ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त

अकोले तालुक्यात अवैध दारूसह ८९ हजारांचा मुद्देमाल जप्त

Breaking News | Akole Crime: दिगंबर रोड येथे छापा टाकून २४ हजार रुपयांच्या देशी दारूबरोबर एकूण ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

Illegal liquor worth Rs 89,000 seized in Akole taluka

राजूर : राजूर पोलिसांनी सोमवारी दुपारी परिसरातील दिगंबर रोड येथे छापा टाकून २४ हजार रुपयांच्या देशी दारूबरोबर एकूण ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक किशोर पवार यांनी दिली.

याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सोमवारी दुपारी अकोले (शाहूनगर) येथील राजेश शिंदे हा दुचाकी (एमएच १७-२५७८) वरून दिगंबर रोड परिसरात अवैध दारूची विक्री वाहतूक करीत आहे, अशी बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार व पोलीस उपनिरीक्षक विलास माळवदे, सहाय्यक फौजदार मोरे, हवालदार सचिन शिंदे, नरवडे, सुवर्ण शिंदे, सुनील रत्नपारखी, विजय काळे, परते यांच्या पथकाने सोमवारी दुपारी दोन वाजता या परिसरात छापा टाकला. यात राजेश शिंदे याच्याकडे २४ हजार रुपये किमतीच्या ६०० देशी बॉबी संत्रा कंपनीच्या ९० मिलीच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत त्याच्याकडून प्रत्येकी ४० रुपये किमतीच्या बाटल्या व ६५ हजार रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची दुचाकी अशी असा एकूण ८९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलीस ठाण्यात आरोपी शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठ दिवसांपूर्वी राजूर पोलिसांनी सहायक पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील देवगाव व लाडगाव परिसरातही छापा टाकत २५ हजार रुपयांहून अधिक रकमेची अवैध विक्रीसाठी आणलेली देशी दारू जप्त करत आरोपींवर गुन्हे दाखल केले होते.

Breaking News: Illegal liquor worth Rs 89,000 seized in Akole taluka

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here