अवैध वाळूच्या भरलेल्या ट्रॅक्टरने दोन तरुणांना चिरडले, दोघांचा जागीच मृत्यू
Breaking News | Beed Crime: वाळूच्या भरलेल्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोराची धडक देऊन दोन जणांना चिरडले. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू.
बीड: माजलगाव तालुक्यात वाळू माफियांनी वाळू चोरीचा कहर केला आहे. तालुक्यातील सादोळा गावानजीक असलेल्या सांगवी पुलाजवळ वाळूच्या भरलेल्या ट्रॅक्टरने मोटरसायकलला जोराची धडक देऊन दोन जणांना चिरडले. यात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि.३०) रात्री ११ च्या सुमारास घडली.
विजय युवराज पगारे (वय ३७) व महेश रावसाहेब ढोकचवळे (वय ३३, दोघे रा. रांजणखोल, ता. राहाता, जि. नगर) अशी मृतांची नावे आहेत.
10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका – Education Portal
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास पगारे आणि ढोकचवळे हे दोघेजण दुचाकीवरून (एमएच १७ सी.डब्ल्यू.३२०९) सादोळा गावाजवळील सांगवी पुलावरून आष्टी शहराकडे जात होते. यावेळी सादोळा गंगा पात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या ट्रॅक्टरने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दोघे जण जागीच ठार झाले. दरम्यान, या अपघातानंतर ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर घेऊन पळून जात होता. यावेळी ट्रॅक्टर पलटी झाला. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पंचनामा करण्यात आला आहे. ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक झोनवाळ करीत आहे.
Web Title: illegal sand-laden tractor crushed two youths, killing them on the spot
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study