Home संगमनेर संगमनेर: अवैधरित्या वाळूची वाहतूक, उसाच्या शेतात ट्रॅक्टर सोडून गेला पळून

संगमनेर: अवैधरित्या वाळूची वाहतूक, उसाच्या शेतात ट्रॅक्टर सोडून गेला पळून

Breaking News | Sangamner: अवैधरित्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून वाळूची वाहतूक करताना तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले.

Illegal transportation of sand, abandoned tractor in sugarcane 

संगमनेर:  शुक्रवार दि. ८ मार्च रोजी सकाळी ६ वाजता तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक शिवारात अवैधरित्या ट्रॅक्टर ट्रॉलीतून वाळूची वाहतूक करताना तालुका पोलिसांच्या पथकाने पकडले. या कारवाईत पोलिसांनी अर्धा ब्रास वाळू व ट्रॅक्टर-ट्रॉली असा एकूण २ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत तालुका पोलिसांकडून समजलेली अधिक माहिती अशी, की चोरून वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांना समजली होती. त्यानुसार पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने विना क्रमांकाचा टॅक्टर वाळूसहीत पकडला. यावेळी अज्ञात चालक उसाच्या शेतात ट्रॅक्टर सोडून पळून गेला.

याप्रकरणी पोकॉ. बाबासाहेब शिरसाठ यांनी दिलेल्या संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास ढुमणे अवैध वाळू वाहतुकीच्या विरोधात चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. साधारण पंधरा दिवसांच्या आत त्यांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या सहा ते सात वाहनांवर कारवाई केली आहे.

फिर्यादीवरून ट्रॅक्टरवरील अज्ञात चालक व मालकावर गुरनं. १६४/२०२४ भादंवि कलम ३७९, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोहेकॉ. डी. जी. दिघे करत आहेत.

Web Title: Illegal transportation of sand, abandoned tractor in sugarcane 

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here