Home संगमनेर संगमनेरात बैलगाडीतून अवैध वाळू वाहतूक

संगमनेरात बैलगाडीतून अवैध वाळू वाहतूक

Breaking News | Sangamner: बैलगाडीतून अवैधरीत्या वाळू वाहतूक

Illegal transportation of sand by bullock cart in Sangamner

संगमनेर : विना क्रमांकाच्या प्रवासी रिक्षातून अवैधरीत्या वाळू वाहतूक करण्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली असतानाचा आणखी अवैध वाहतुकीचा प्रकार समोर आला आहे. चक्क बैलगाडीतून वाळू वाहतूक होत असल्याचे समोर आले आहे.  

 बैलगाडीतून अवैधरीत्या वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर संगमनेर शहर पोलिसांनी कारवाई केली. शनिवारी (दि.२९) पहाटे ५:३० वाजेच्या सुमारास संगमनेर खुर्द परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत वाळूने भरलेली बैलगाडी आणि इतरही वस्तू असा एकूण १५,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी गणेश दुर्योधन गोफणे (वय ३८, रा. भीमनगर, संगमनेर खुर्द) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कॉन्स्टेबल हरिश्चंद्र बांडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Illegal transportation of sand by bullock cart in Sangamner

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here