धक्कादायक! सहकारी शिक्षिकेशी अनैतिक संबंध अन् ब्लॅकमेलिंग; शिक्षकाने मृत्यूला कवटाळले
अनैतिक संबंधाला कंटाळून जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची खळबळजनक घटना.
नांदेड: अनैतिक संबंधाला कंटाळून जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. हदगांव तालुक्यातील गारव्हाण जिल्हा परिषदेत गुरुवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. अनिल मोहन चव्हाण असं या शिक्षकाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी त्या शिक्षकाने चिट्ठी देखील लिहीली आहे. शाळेतील महिला शिक्षकेकडून सुरु असलेल्या ब्लॅकमेलिंगमुळे आत्महत्या करीत असल्याचे त्या शिक्षकाने चिठ्ठीत लिहले आहे.
संबंधित सहशिक्षिकेने पैश्याची मागणी करत ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. दूसरीकडे पतीच्या अनैतिक संबंधाची कुणकुण शिक्षकाच्या पत्नीला लागली होती. एकीकडे ब्लॅकमेल सुरु होतं आणि दूसरीकडे या प्रकरणाची घरी माहिती लागल्याने ते मानसिक तणावात होते. यामुळेच संबंधित शिक्षकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
मयत अनिल चव्हाण हे हदगांव तालुक्यातील गारगव्हाण येथील जिल्हा परिषदमध्ये शिक्षक पदी कार्यरत होते. २०१४ साली त्यांची शाळेत शिक्षक म्हणून नियुक्त झाली होती. सेवेदरम्यान त्या शिक्षकाची शाळेतील एका महिला शिक्षिकेशी ओळख झाली. या दरम्यान महिला शिक्षिकेने अनिल चव्हाण यांच्याकडून घर घेण्यासाठी पैसे मागितले होते. त्यानुसार त्या शिक्षकाने महिला शिक्षिकेला घर घेण्यासाठी ३ लाख ४० हजार रुपये उसने दिले होते.
काही महिन्यानंतर त्या शिक्षकाने महिला शिक्षिकेला पैसे परत करण्याची विनंती केली. मात्र त्या महिला शिक्षिकेने पैसे काही परत केले नाही. त्यातच अनिल चव्हाण यांनी लोकांकडून कर्ज घेतले होते. लोकांकडून कर्ज घेतल्याने ते कर्जबाजारी देखील झाले होते. तेव्हा हतबल झालेल्या त्या शिक्षकाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री ते परीक्षेचे पेपर तपासायचे आहेत असं खोटं सांगून घरातून निघाले.
शाळेत पोहोचल्यानंतर त्या शिक्षकाने एक चिठ्ठी लिहिली. “शाळेतील एका महिला शिक्षिकेला मी घर घेण्यासाठी ३ लाख ४० हजार रुपये दिले होते. पण ते मला पैसे परत देत नाहीये. माझ्यावर अन्याय झालाय. मी कर्जबाजारी झालोय”, असं चिठ्ठीत लिहित त्या शिक्षकाने शाळेतील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास शाळेत आलेल्या सेवकाला अनिल चव्हाण यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मनाठा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला आणि त्यानंतर शवविच्छदनासाठी मृतदेह हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. मयत अनिल चव्हाण यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. दरम्यान, या प्रकरणी महिला शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मयत शिक्षकाच्या पत्नीने पोलीस ठाण्यात ठिय्या केला.
Web Title: Immoral Relationship with fellow teacher and blackmailing The Teacher Suicide
See Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App