Home संगमनेर संगमनेर: धनादेश न वटल्याने एकास कारावास

संगमनेर: धनादेश न वटल्याने एकास कारावास

Breaking News | Sangamner:  धनादेश न वटल्याने त्यास अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. बी. देशमुख यांनी १ वर्षाचा कारावास व धनादेशाची रक्कम ४ लाख ९५ हजार रुपयांची दुप्पट रक्कम ९ लाख ९० हजार रुपये न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा.

Imprisonment for non-cashing of cheques

संगमनेर: येथील संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेला फारुख निसार शेख (नाईकवाडपुरा, संगमनेर) यांनी दिलेला धनादेश न वटल्याने त्यास अतिरीक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. बी. देशमुख यांनी १ वर्षाचा कारावास व धनादेशाची रक्कम ४ लाख ९५ हजार रुपयांची दुप्पट रक्कम ९ लाख ९० हजार रुपये न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

निसार ताजमहंमद शेख याम) संग्राम पतसंस्थेतून २०१४ साली ४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. या क़र्जाच्या थकबाकीपोटी त्यांचा मुलगा फारुख निसार शेख यांनी पतसंस्थेला ४ लाख ९५  हजार रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र त्याच्या खात्यात पुरेशी रक्कम नसंल्याने तो वटला नाही. संस्थेने वकिलामार्फत नोटीस पाठवून कर्जदाराकडे धनादेशाच्या रकमेची मागणी केली. त्यामुळे त्याच्या विरोधात संगमनेर येथील अतिरिक्त न्यायदंडाधिकारी जी. बी. देशमुख यांच्या न्यायालयात दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी होऊन १ वर्षाचा कारावास व धनादेशाची रक्कम ४ लाख ९५ हजार रुपयांची दुप्पट रक्कम ९ लाख ९० हजार रुपये न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या दाव्याचे कामकाज संस्थेतर्फे वकील बी. के. वामन यांनी पाहिले.

Web Title: Imprisonment for non-cashing of cheques

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here