Home Crime News बिअरसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्राच्या पोटात खुपसली बॉटल

बिअरसाठी पैसे दिले नाही म्हणून मित्राच्या पोटात खुपसली बॉटल

Chandrapur Crime

Chandrapur Crime : बिअर पिण्यासाठी तीन मित्र एकत्र बसले होते. जवळ असलेली बिअर संपल्याने इतर दोघांनी बिअरसाठी तिसऱ्याकडे पैसे मागितले. मात्र तिसऱ्या मित्राने पैसे देण्यास नकार दिला. नकार ऐकताच रागाच्या भरात दोन मित्रांनी आपल्याच मित्रा सोबत बाचाबाची केली. यानंतर रागाच्या भरात मित्राच्या पोटात बिअरची बाटली खुपसल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील बल्हारपूर येथे घडली.

शाहरूख पठाण असे जखमीचे नाव आहे. तर निरज यादव, अंकित रामटेके या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. बिअरसाठी पैसे दिले नाही म्हणून दोन मित्रांनी आपल्याच मित्राच्या पोटात बिअरची बॉटल खुपसल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. बल्लारपूर शहरातील बिरसा मुंडा चौकात ही घटना घडली. तिघांनीही बिअर पिली होती. मात्र निरज यादव आणि अंकित रामटेके यांनी परत बिअर पिण्यासाठी शाहरुख पठाण या मित्राला पैसे मागितले. मात्र शाहरूखने नकार दिला. नकार ऐकताच दोघांचा पारा भडकला.

रागाच्या भरात बिअरची बॉटल शाहरूखचा पोटात खुपसली. यात शाहरूख गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत शाहरुखला एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेची तक्रार बल्हारपूर पोलीस स्टेशनला करण्यात आली. पोलिसांनी आरोपी नीरज यादव आणि अंकित रामटेके यांना अटक केली आहे. पुढील तपास बल्हारपूर पोलीस करीत आहेत.

Web Title : In Chandrapur, a friend was hit in the stomach with a bottle for not paying for beer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here