Home Crime News धक्कादायक ! मित्राने केला पत्नीवर बलात्कार; घराबाहेर दिला पतीने पहारा

धक्कादायक ! मित्राने केला पत्नीवर बलात्कार; घराबाहेर दिला पतीने पहारा

Hingoli Rape

हिंगोली : हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाने चक्क आपल्याच पत्नीवर मित्राला बलात्कार (Rape) करायला लावला आहे. बायको घरी एकटी असल्याचं पाहून आरोपी पती आपल्या मित्राला घरी घेऊन आला. यावेळी त्याने आपल्या मित्राला घरात पाठवून स्वतःच्याच पत्नीवर बलात्कार घडवून आणला. या प्रकरणी पीडित महिलेनं हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी पतीसह त्याच्या मित्रा विरोधात बलात्कारासह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास पीडित महिला घरी एकटीच होती. यावेळी आरोपी पती आपला मित्र माधव जोगदंड याला घरी घेऊन आला होता. यावेळी आरोपी पती स्वतः घराबाहेर लक्ष ठेवण्यासाठी थांबला व आपल्या मित्राला घरात पाठवले. आत गेलेल्या मित्राने पीडित महिलेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. याचवेळी विकृत पती घराबाहेर उभा राहून पहारा देत होता.

वासनांध मित्राने देखील मैत्रीला काळिमा फासत मित्राच्या पत्नीला आणि मुलीला चाकुचा धाक दाखवून जबरी अत्याचार केला. या धक्कादायक घटनेनंतर पीडित महिलेनं हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. यानंतर पोलिसांनी पीडित महिलेच्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात बलात्कारासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Web Title : In Hingoli, a husband raped his wife by a friend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here