Home Crime News धक्कादायक : प्रियकराच्या मदतीनं आईनंच संपवलं पोटच्या गोळ्याला

धक्कादायक : प्रियकराच्या मदतीनं आईनंच संपवलं पोटच्या गोळ्याला

Mother killed his own son

जळगाव : आईनं आपल्या पोटच्या मुलाला प्रियकराच्या मदतीनं संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आईचे अनैतिक संबंध कळल्यामुळे आईनंच लेकराच्या हत्येचा कट रचल्याचं उघड होत आहे. जळगावात घडलेल्या या धक्कादायक प्रकारानं एकच खळबळ उडाली असून खुनाचा कट रचणारी आई आणि तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे. या दोघांनीही आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

जळगावातील या प्रेमीयुगुलानं प्रेमाला अडथळा ठरणाऱ्या अवघ्या 15 वर्षांच्या मुलाला मध्य प्रदेशात नेऊन झाडाला लटकवलं होतं. पोलिसांनी मोठ्या शर्थीनं याप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सध्या अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. स्वतःचं पाप झाकण्यासाठी चक्क आईनंच मुलाला संपवण्याचा कट (Mother killed his own son) रचल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त केलं जातंय. सावखेडा येथील जलाराम नगरमध्ये राहणाऱ्या पुरुषोत्तम उर्फ प्रशांत विलास पाटील या 15 वर्षांच्या मुलाला गळफास देण्यात आला. या हत्येचा थरारक आणि अंगावर काटा आणणारा घटनाक्रमही उघडकीस आला आहे.

पुरुषोत्तम उर्फ प्रशांत याला आपल्या आईच्या अनैतिंक संबंधांबाबत कुणकुण लागली होती. प्रशांतची आई मंगलाबाई आणि प्रमोद शिंपी यांचे वर्षभरापासून अनैतिक संबंध होते. यामुळे प्रशांतने आईला हा प्रकार बंद करायला सांगितला. मात्र प्रेमात आंधळ्या झालेल्या मंगलाबाई आणि प्रमोद यांनी पुरुषोत्तमच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर त्याचाच काटा काढण्याचा कट त्यांनी रचला.

16 जानेवारी रोजी पुरुषोत्तमच्या आईनं त्याला कबुतराला पिंजरा घ्यायला जा असं सांगून आपला प्रियकर प्रमोदसोबत पाठवलं. प्रमोद आपल्या आणखी एका मित्राला घेऊन पुरुषोत्तमला मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या जंगलात गेला. त्यांनी रावेरातून एक दोरही विकत घेतला होता. बऱ्हाणपूरच्या आरीसगड इथल्या जंगलात नेऊन प्रमोदने पुरुषोत्तमला गळफास दिला आणि ठार मारलं. पुढे हा प्रकार उघड झाल्याने निष्ठूर आईसह तिच्या प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

Web Title : In Jalgaon, a mother killed her own son with the help of her boyfriend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here