Home Uncategorized पोलिसात तक्रार केली म्हणून तरुणाने तरुणीच्या डोक्यात घातला हातोडा

पोलिसात तक्रार केली म्हणून तरुणाने तरुणीच्या डोक्यात घातला हातोडा

Pune Crime

Pune Crime : राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीत. पुण्यातही महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांत आता वाढ होताना दिसत आहे. पुण्यातील तळेगाव (Talegaon) येथून एक खळबळजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीच्या डोक्यात एका तरुणाने हातोडा मारुन तिच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.

पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांत छेडछाडीची तक्रार केल्याचा राग मनात धरुन आरोपीने या मुलीवर हातोडीने हल्ला केला. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी तरुणाने ‘तुला जिवंत सोडणार नाही, तुला खल्लास करतो’ असं म्हणत तरुणीच्या डोक्यात हातोडा घातला. या घटनेत पीडित मुलगी गंभीररित्या जखमी झाली असून त्या मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी ही 17 वर्षीय आहे. या मुलीने काही दिवसांपूर्वी आरोपी शिवम शेळके याच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली होती. आरोपी छेडछाड करत असल्याची तक्रार पोलिसांत तिने दिली होती. याचाच राग मनात धरुन आरोपीने तिच्यावर हा प्राणघातक हल्ला केला आहे. आरोपी शिवम शेळके हा 20 वर्षीय असून तो तळेगाव दाभाडे येथे राहणारा असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Web Title : In Talegaon, a young man hit a young woman on the head with a hammer

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here