ऐन निवडणुकीत तरुणाच्या डोक्यात दगड घालून हत्या
Breaking News | Beed Crime: नदीपात्राच्या रस्त्यालगत एकाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना.
बीड : शहरातील अमरधाम स्मशानभूमीलगत असलेल्या बिंदुसरा नदीपात्राच्या रस्त्यालगत एकाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना घडली. गुरुवारी (ता. १४) सकाळी नागरिकांना संबंधित तरुणाचा मृतदेह दिसून आला. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, अधिक तपास पोलिस करत आहेत. सय्यद मजर सय्यद अख्तर (वय ४०, रा. बिलवाडी तांदळा, ता. बीड) असे मृताचे नाव आहे. शहरातील अमरधाम स्मशानभूमीलगत असलेल्या बिंदुसरा नदीपात्राच्या रस्त्यालगत त्याची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी समोर आली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला;
तसेच अधिक तपासासाठी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. पोलिसांनी लिंबाजी लक्ष्मण कानडे (वय ४२) व अनिता नरसिंग आदमाने (रा. माळीवेस, बीड, वय ३०) यांना ताब्यात घेत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web Title: In the election, a young man was killed by throwing a stone
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study