Home Crime News बापरे ! स्वयंपाक न केल्याच्या वादातून पत्नीने पतीला….

बापरे ! स्वयंपाक न केल्याच्या वादातून पत्नीने पतीला….

Yavatmal Crime

यवतमाळ : (Yavatmal ) जिल्ह्यातील बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अनाकलनीय घटना घडली आहे. एका महिलेनं भाजी कापायच्या सुरीने आपल्या पतीवर सपासप वार केले आहेत. आरोपी महिलेनं पतीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर, घटनास्थळावरून लगेचच पळ काढला. या हल्ल्यात पीडित पती गंभीरपणे जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाच्या कलमाअंतर्गत या विक्षिप्त महिलेवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास बिटरगाव पोलीसांकडून सुरू आहे.

नागोराव शिनकरे असं हल्ला झालेल्या ३० वर्षीय फिर्यादी पतीचं नाव आहे. तर गंगा सागर शिनकरे असं गुन्हा दाखल झालेल्या ३० वर्षीय पत्नीचं नाव आहे. शिनकरे दाम्पत्य उमरखेड तालुक्यातील करंजी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या रात्री आरोपी पत्नीनं घरी जेवण बनवले नव्हते. त्यामुळे फिर्यादीचा पतीने आपल्या पत्नीसोबत वाद झाला. या अगोदरही या दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणातून वाद होत होते. घटनेच्या दिवशी मात्र दोघांमध्ये जोरदार भांडण झालं. यावेळी आरोपी पत्नीने ‘तुझी एखाद्या दिवशी सोय लावते’ असे म्हणत पतीला धमकी दिली. यामुळे दोघांमधील वाद आणखी वाढला.

राग अनावर झालेल्या पत्नीने भाजी कापायच्या चाकुने पतीच्या पोटावर सपासप वार केले. या हल्ल्यात फिर्यादी पती हा गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यानंतर भानावर आलेल्या पत्नीनं घाबरून घटनास्थळावरून पळ काढला. हल्ल्यानंतर आसपासच्या लोकांनी पती नागोराव यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून बुधवारी त्यांनी बिटरगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाच्या कलमाअंतर्गत विक्षिप्त पत्नीवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास बिटरगाव पोलीस करत आहेत.

Web Title : In Yavatmal, the wife attacked her husband with a knife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here