शिक्षकी पेशाला काळिमा, अल्पवयीन मुलीला पाहून शिक्षक वर्गात शिरला अन् बंद केला दरवाजा
Mumbai Crime: पीटीआय शिक्षकाने विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग (Molested) केल्याची घटना.
मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये अत्याचार, लैगिंक अत्याच्याराच्या घटनांमध्ये झपाट्यानं वाढ होतानाचं भयावह चित्र आहे. अशा घटना घडल्यानंतर यामध्ये राजकीय हस्तक्षेपही होताना दिसत आहे. अशातच आता दादरमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
एका पीटीआय शिक्षकाने विद्यार्थिनीचा शाळेतच विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकाला भोईवाडा पोलिसांनी अटक केली आहे. गौरव चौहान असे शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेली अधिक माहिती अशी की, 12 वर्षीय मुलगी दादरच्या पूर्व भागातील एका शाळेत शिकत आहे. 27 डिसेंबर रोजी मुलगी शाळेत रेसलिंगच्या सरावासाठी आली होती. मुलगी शाळेच्या वर्गात एकटीच असल्याचे पाहून शिक्षक गौरव चौहान हा वर्गात शिरला. वर्गाबाहेर डोकावून बाहेर कोणी नसल्याची खात्री करून गौरवने वर्गाचा दरवाजा बंद केला.
त्यानंतर गौरवने मुलीच्या इच्छेविरोधात तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. शाळेतील पीटी शिक्षकाच्या या वर्तणुकीनंतर मुलगी मानसिक तणावाखाली होती. पालकांनी याबाबत तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने सर्व हकीकत सांगितली. यानंतर पालकांनी तत्काळ भोईवाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पालकांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गौरव चौहान या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.
Web Title: Incident of PTI teacher molesting a student in school
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News