IND vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज एकदिवसीय मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. अहमदाबादच्या नव्या स्टेडियमवर मालिकेतील तिन्ही सामने खेळवले जाणार आहेत.मागील वर्षी याच स्टेडियममध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी आणि एकदिवसीय मालिका झाल होती. मात्र या मालिकेसाठी प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार नसल्याचे गुजरात क्रिकेट असोसिएशनकडून सांगितले गेले आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झालेला आहे.
सध्याच्या कोरोना परिस्थितीमुळे संपूर्ण मालिका प्रेक्षकांविना पार पडणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारीला होणार आहे. मात्र हा सामना एक ऐतिहासिक सामना असणार आहे. भारतीय संघाचा हा १००० वा एकदिवसीय सामना असणार आहे. दक्षिण आफ्रिकेशी झालेला शेवटचा सामना हा भारताचा ९९९ वा सामना ठरला होता ज्यात भारताने पराभव पाहिला. १००० एकदिवसीय सामने खेळणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरणार आहे. मालिकेतील दुसरा सामना ९ फेब्रुवारीला रंगणार आहे तर तिसरा सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे.
अहमदाबादमध्ये एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर दोन्ही संघ कोलकात्याला रवाना होणार आहेत. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांचीच टी-२० मालिका देखील रंगणार आहे.
Web Title : IND vs WI The whole series will be without an audience